
व्याजाने घेतलेल्या एक लाख रुपयांच्या कर्जावरून कळंबीतील एका 75 वर्षीय शेतकऱ्याची जमीन, घर आणि अन्य मालमत्ता जबरदस्तीने विकायला लावल्याचा आणि धमक्या दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. सावकारकीप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. उदय आनंदराक माळके (रा. लक्ष्मीनगर, कंजारकाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत कळंबी येथील बाबासाहेब गणपती सुतार (वय 75) यांनी फिर्याद दिली.
बाबासाहेब सुतार यांनी 10 ऑगस्ट 2015 रोजी उदय माळके याच्याकडून 1 लाख रुपये 10 टक्के मासिक व्याजाने कर्ज घेतले होते. सुरुवातीला सहा-सात महिने व्याजाची रक्कम दिली असली, तरी नंतर परतफेड करता आली नाही. त्यानंतर सन 2017 मध्ये बँक ऑफ इंडियातून सात लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्यांनी सुमारे तीन लाख रुपये व्याज व मुद्दल परत केले. उर्वरित रक्कम कसूल करण्यासाठी उदय माळके यांनी सुतार यांना कळंबी येथील दीड एकर जमीन जबरदस्तीने विकायला लाकली. त्या विक्रीतून मिळालेल्या पैशांतील चार लाख रुपये माळके यांनी घेतले. त्याचबरोबर सुतार यांचे राहते घर उदय माळके यांच्या आईच्या नाकावर खरेदीखत करून घेतले. तसेच दुसरे घर 10 ऑक्टोबर 2017 रोजी नोटरी तारण गहाण म्हणून माळके यांच्या नाकावर करून घेतले होते. नंतर 28 जून 2018 रोजी सात लाख पन्नास हजार रुपये रोख घेऊन ती तारण नोटरी रद्द केली आहे. त्याचबरोबर सुतार यांनी बंधन बँक व किनारा कॅपिटल बँक, कराड येथून कर्ज घेऊनदेखील माळके यांना चार लाख रुपये परत दिले आहेत. तरीही अजून पैसे बाकी असल्याचे सांगत उदय माळके यांनी धमक्या दिल्याचेही सुतार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

























































