
कॉंग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब-हरियाणा शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे. नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले आहेत की, ‘शेतकऱ्यांचा आवाज जगभरास ऐकू येत आहे.’ ते ट्विट करून म्हणाले की, ‘आज देशातील खरे बहुसंख्य लोक आपली शक्ती दाखवत आहेत. शेतकरी आंदोलन देशातील विविधतेत एकतेची भावना निर्माण करीत आहे.’
नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले, ‘असहमतिची ठिणगी संपूर्ण देशाला एकत्र घेऊन आली आहे. ज्यात सर्व जातीच्या व सर्व पंतांच्या लोकांना समावेश आहे. शेतकऱ्यांचा आवाज संपूर्ण जगात ऐकू येत आहेत.’
सिद्धू यांनी आपल्या ट्विटसोबत एक व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यात ते आपल्या शायरीच्या अंदाजात म्हणाले आहेत की, “भट्ठी को दूध पर रखो तो उसका उबलना निश्चित है…और किसानो में रोष और आक्रोश जगा दो तो सरकारों का तख्त ओ ताज उलटना निश्चित है. दरबार ए वतन में जब एक सब जाने वाले जाएंगे… कुछ अपनी मौत को पहुंचेंगे कुछ अपनी सजा को पाएंगे.” सिद्धू म्हणाले, ‘ए खाक नशीनों उठ बैठो, अब तख्त गिराए जाएंगे और ताज उछाले जाएंगे.’
Today, India’s true majority is flexing its muscle. Kisan movement is building unity in diversity, it is the spark of dissent which ignites & unites the whole country in a Single Mass Movement above Caste, Colour & Creed. The “Farmer Roar”, has reverberated world-over … pic.twitter.com/lKtf7746BF
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) December 6, 2020
दरम्यान, शनिवारी शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांची पाचव्या फेरीची बैठक पार पडली. ही बैठकही निष्फळ ठरली आहे. शेतकऱ्यांनी नवीन कृषी कायदा रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे म्हटले आहे. आता 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पुन्हा केंद्रीय मंत्री आणि शेतकऱ्यांची बैठक होणार आहे.




























































