
राज्यातील नाकर्त्या सरकारने नुकसानभरपाई न दिल्याने शेतकरी मरणाला कवटाळत आहेत. त्यातच आज शेतातील नुकसानीची धास्ती घेऊन नागरसोगा येथील बिभीषण पंढरीनाथ साळुंके या तरुण शेतकऱ्याने रविवारी रात्री स्वतःला पेटवून घेतले. त्याला लातूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना आज सोमवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
अवघी एक एकर शेती, वृद्ध आई, वडील अंध आहेत. अशातच परतीच्या पावसाने शेतीतही मोठे नुकसान झाल्याने बिभीषण (33) या तरुण शेतकऱ्याने रविवारी रात्री स्वतŠच्या घरात जाळून घेतले होते.

























































