पादल्यानेही पसरतो कोरोना, मंत्र्याने दिला इशारा

खोकल्यामुळे, शिंकल्याने कोरोना पसरतो असे आतापर्यंत बोलले जात होते. मात्र एका मंत्र्याने चक्क पादल्यामुळे कोरोनाचे विषाणू पसरतात असा दावा केला आहे. हा दावा इंग्लंडमधील मंत्र्यांनी केला आहे. मिरर युकेने याबाबतचे वृत्त  दिले आहे. मंत्र्यांच्या या दाव्यानंतर ब्रिटनचे प्रतंप्रधान बोरिस जॉनसन यांनी या दाव्यावर संशोधन करणार असल्याचे सांगितले आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मलमूत्रात कोरोनाचे विषाणू असतात त्यामुळे त्याच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या खोकल्यात व शिकण्यांत देखील कोरोनाचे विषाणू असतात. याआधारानुसार त्याच्या शरीरातील गॅसमध्ये देखील कोरोनाचे विषाणू असतील असा दावा एका मंत्र्याने केला आहे.

इंग्लंडमध्ये लस घेतलेल्या लोकांचे कोरोनाने मृत्यू, वैद्यकीय तज्ज्ञ चिंतेत

कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी जगभरात लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. पण, इंग्लंडमध्ये मात्र लसीकरणासंबंधीच्या एका अहवालाने वैद्यकीय तज्ज्ञ चिंतेत पडले आहेत. कारण, या अहवालानुसार ज्या नागरिकांनी लस घेतली होती, त्यांची कोरोनाने मृत्यू होण्याची संख्या लस न घेतलेल्यांपेक्षा जास्त आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंज अर्थात पीएचईने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, इंग्लंडमध्ये 1 फेब्रुवारी ते 21 जून या दरम्यान कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटने संक्रमित झालेल्यांपैकी 257 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 163 जणांना कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस दिले गेले होते.

आपली प्रतिक्रिया द्या