गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा

>>पूजा तावरे, फॅशन डिझायनर

उन्हाळा स्मार्ट आणि देखणा होण्यासाठी कूल सनग्लासेस हवेतच

लाही लाही ऊन ऊन लाही लाही झळा… अशा उन्हाळ्यात फिरायचं म्हणजे त्वचेची, केसांची काळजी घेणं आलंच. तशीच डोळ्यांचीही काळजी घ्यायला हवीच ना! उन्हाळ्यात डोळ्यांना थंडावा देणारे सनग्लासेस हवेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच कडक ऊन सर्वांनाच सतावू लागते. अशा वेळी धुर आणि धुळीपासून बचाव होण्यासाठी सनग्लासेसची मागणी वाढत असते.

आजच्या आधुनिक जगातील महिला आपल्या करीयरमध्ये वेगाने प्रगती करण्यासाठी उत्सुक असतात. त्यासाठी त्यांना आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक व आधुनिक ठेवावे लागते. त्यामुळे आपली वेशभूषा आणि अन्य ऍक्सेसरीज तितक्याच दर्जेदार व आकर्षक असाव्यात यासाठी महिला दक्ष असतात. त्यामध्ये महिलांच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देणारी सर्वात महत्त्वाची ऍक्सेसरीज म्हणजे सनग्लासेस किंवा गॉगल. विविध प्रकारच्या सनग्लासेसमुळे स्टाइल आणि फॅशन या दोन्हीचा आगळावेगळा संगम साधला जातो.

सध्या मोठय़ा आकाराच्या गॉगल्सची प्रचंड क्रेझ तरुणींमध्ये दिसत आहे. सध्या गॉगल्स हे एक भन्नाट स्टाईल स्टेटमेंट म्हणून इन आहे. व्हेकेशन असो, शॉपिंग असो, बाईकवर असो, कारमध्ये असो की लोकलमध्ये प्रवास करताना असो त्यासाठी स्टायलीश गॉगल हवाच. केवळ डोळ्यांची काळजी घेणे हा गॉगल्स घालण्यामागचा हेतू असला, तरी स्टाईल स्टेटमेंट म्हणूनही तरुणींमध्ये गॉगल्स् लोकप्रिय आहे. अनेक आकार आणि रंगांचे गॉगल्स् सध्या बाजारात उपलब्ध आहेत. गॉगलमुळे आपल्या सौदर्यांला एक स्टायलिश लुकही मिळतो त्यामुळे तरुणींमध्ये गॉगल्सची क्रेझ पुन्हा दिसू लागली आहे. विशेष म्हणजे कोणताही आऊटफीट असो गॉगलमुळे एक रॉकिंग लुक प्राप्त होतो.

आधुनिक डिझाईन व उपयुक्तता याचा मेळ घालून बनविण्यात येणाऱया गॉगल व सनग्लासेसमुळे व्यक्तिमत्त्वालाही उठाव मिळत आहे. हळूहळू सनग्लासेस हा पर्सनॅलिटी ट्रेंड सेंटर म्हणून सनग्लासेसने नाव मिळवले. आपले व्यक्तिमत्त्व वेशभूषा व्यवसाय यांना साजेशा सनग्लासेस खरेदी करण्याकडे महिला वर्गाचा कल सध्या वाढलेला दिसत आहे. सध्याच्या समर सीझनमध्ये क्लासिक पायलट एव्हिएटस हे सनग्लासेस फॉर्ममध्ये दिसून येत आहे. हे दिसायला स्टायलीश असून यामध्ये विविध रंग उपलब्ध आहेत.

विविध डिझाइन्स...

> वेस्टर्न किंवा एथनिक, पोशाख कुठलाही असो, एलिगंट गॉगल वापरल्यास आकर्षक लुक मिळतो.

> सध्या ब्रँडेड सनग्लास वापरण्याकडे तरुणींचा कल आहे. ते महाग असले तरी लुक्सच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाईज्. फास्टट्रक, रेबॅन, जॉर्जो, स्पिडो, माउई जिम, रेबॅन वेफॅरर, ओकलेय, प्राडा, कॅट आय शेक, अँटी ग्लेअरची सध्या चलती आहे.

> महागडय़ा गॉगल्स्चे कॉपी केलेले गॉगल्सही निम्म्या किंमतीत बाजारात उपलब्ध आहेत. आकर्षक लुक आणि नव्या डिझाईनच्या गॉगल्समुळे पर्सनॅलिटीला एक वेगळाच लुक दिसून जातो. याबरोबरच हलक्या रंगांच्या गॉगल्सचीही चलती आहे.

> सनग्लासेस ही फॅशन ऍक्सेसरीज असली तरी डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून शक्यतो ब्रँडेड सनग्लासेसची निवड करणे योग्य ठरेल.

> मार्केटमध्ये गॉगल्सच्या विविध डिझाइन्स असल्या तरी मोठय़ा डिझाइन्सचे आणि हलक्या शेडमधील गॉगल्सची मोठी मागणी आहे.

> कडक उन्हाळ्यात डोळ्यांना थंडावा देणाऱया रेबॅन गॉगल्सलाही पसंती आहे. कडक उन्हाळ्यात ब्रँडेड गॉगल्सची मागणी वाढत आहे.