फॅशन पॅशन-COMFORTABLE MAN

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ललित प्रभाकर

आवडती फॅशन-कम्फर्टेबल कपडे माझ्यासाठी फॅशन.

फॅशन म्हणजे- परत मी तेच म्हणेन की आपल्या कम्फर्टनुसार जी फॅशन केली जाते ती फॅशन.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता?-मला ढगळ कपडे घालायला आवडतात. मला खूप टाईट, अंगाबरोबर असे कपडे आवडत नाहीत.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की?- नाही, फक्त कपडे नाही. तुमचं व्यक्तिमत्त्व.

आवडती हेअरस्टाईल?- एक अशी नाही. वेगवेगळ्या हेअरस्टाईल आवडतात.

फॅशन जुनी की नवी?- जुनी-नवी अशी काही आवडत नाही. तिथेही मी कम्फर्ट पाहतो. पण माझा जुन्याकडे जास्त कल आहे. जुन्या पद्धतीचे कपडे आवडतात.

आवडता रंग?-काळा.

तुमच्या जवळच्या माणसांना तुमची कोणती फॅशन आवडते?- तसे पाहायला गेले तर सगळ्यांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात. माझ्या जवळच्या माणसांच्या मते मी सगळ्यातच चांगला दिसतो.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का?-आवडते. ठरवून मी कपडे घेत नाही. मला जे आवडते, चांगले वाटते ते मी घेतो. त्यामुळे स्ट्रीट शॉपिंग करताना ती वस्तू आवडावी लागते एवढेच स्ट्रीट शॉपिंग करण्याचा उद्देश असतो. ठरवून काही घ्यायला जात नाही. आवडले की घेतो.

ज्वेलरी काय आवडते?-घडय़ाळं.

आवडता ब्रॅण्ड-मी ब्रॅण्ड ठरवून कपडे घेत नाही. वस्तू आवडली की ती लगेच घेतो.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी?- काहीच नाही. फॅशनेबलपेक्षा कम्फर्टेबल किती आहे ते मी पाहतो. त्यामुळे अपडेट राहण्याची गरज लागत नाही.

फॅशन फॉलो कशी करता-फॅशन फॉलो करत नाही. दुकानात गेल्यावर जे काही नवीन दिसत ते घेतो.
ब्युटी सिक्रेट-मी ‘मी’ असतो.

टॅटू काढायला आवडेल का?-अजून तरी विचार नाही. जेव्हा आपण टॅटू काढतोय तो विचारपूर्वक काढावा कारण तो कायमस्वरूपी आपल्या शरीरावर राहणार असतो.‘ त्यावर विचार असावा.

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी- हेडफोन्स, पुस्तक आणि बॅग.

फिटनेससाठी- धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकालाच व्यायाम करायला वेळ मिळतोच असा नाही. पण निरोगी आरोग्यासाठी किमात शरीर सतत कार्यशील ठेवणे गरजेचे आहे.