फास्टटॅग बंद होणार? आता ‘जीपीएस’ टोलवसुली, संसदीय समितीची शिफारस

महामार्गांवरील टोलनाक्यांवर लागणाऱया लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी फास्टटॅग प्रणाली आणली. परंतु वर्षभरातच फास्टटॅग बंद होण्याची दाट शक्यता आहे. ‘जीपीएस’ पद्धतीने टोलवसूल केला जावा अशी शिफारस परिवहन आणि पर्यटनाशी संबंधित संसदीय स्थायी समितीने केली आहे.

संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष टी. जी. व्यंकटेश यांनी संसदेत अहवाल सादर केला आहे. 1 जानेवारी 2021 पासून टोलनाक्यांवर फास्टटॅगद्वारे टोल आकारला जात आहे. रोख पैशांचा व्यवहार नसल्यामुळे टोलनाक्यांवर रांगा लागत नाहीत. वेळ आणि इंधनाची बचत होते असा फास्टटॅगचा उद्देश आहे. परंतु अनेकदा बारकोड स्कॅन होत नसल्यामुळे वेळही वाया जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे फास्टटॅग प्रणाली बदलण्याची शिफारस केल्याचे वृत्त आहे.

जीपीएस प्रणाली काय आहे?

  • जीपीएस प्रणाली लागू केल्यास थेट वाहनचालकाच्या बँक खात्यातून टोल शुल्क वसुल केला जाईल.
  • जीपीएसमुळे वाहनाचे लोकेशनही समजणार आहे.
  • टोलवसुलीसाठी जीपीएस यंत्रणा सुरू करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सरकारने म्हटले आहे.