दहशतवाद संपवा, ‘एफएटीएफ’चा पाकिस्तानला इशारा

403

‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला काळय़ा यादीत न टाकता सुधारण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे तूर्तास पाकिस्तानवर आर्थिक बंदी लादली जाणार नाही. पण दहशतवाद संपवला नाही, दहशतवादी संघटनांची आर्थिक नाकेबंदी केली नाही तर कारवाई करू असा इशारा ‘एफएटीएफ’ने दिला आहे. ‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला दहशतवादी संघटनांचा निधी रोखण्यासाठी फेब्रुवारी 2020 पर्यंतची मुदत दिली आहे.

पॅरिसमध्ये गेले पाच दिवस सुरू असलेली फायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्सची (एफएटीएफ) बैठक शुक्रवारी संपली. ‘

एफएटीएफ’ ही आंतरराष्ट्रीय संस्था दहशतवाद्यांची आर्थिक नाकेबंदी न करणाऱया देशांना काळय़ा यादीत टाकून त्यांच्यावर आर्थिक बंदी घालते. या बैठकीत पाकिस्तानला काळय़ा यादीत टाकण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पाकिस्तानला इशारा देऊन सोडण्यात आले आहे. पाकिस्तानला ‘एफएटीएफ’ने काळय़ा यादीत टाकले तर त्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, युरोपियन संघटना यासारख्या मोठय़ा संस्थांकडून कोणतीही आर्थिक मदत मिळणार नाही. आधीच महागाई आणि कर्जाच्या विळख्यात असलेल्या पाकिस्तानला हे परवडणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या