दारू पिऊ देत नव्हती म्हणून नराधम बापाने केली मुलीची हत्या

947

जळगावमध्ये एका नराधम बापाने आपल्या सात वर्षाच्या मुलीचा खून केला आहे. मुलगी बापाला दारू पिऊ देत नव्हती म्हणून या क्षुल्लक कारणावरून बापाने मुलीचा खून केला आहे.

संदीप चौधरी याच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती, त्यांची सात वर्षाची मुलगी आणि नवरा बेपत्ता झाले आहेत. तेव्हा पोलिसांनी तपास केला असता गावातील नदीजवळ मुलीचा मृतदेह आढळला. मुलगी जेव्हापासून बेपत्ता आहे तेव्हापासून संदीप चौधरीही बेपत्ता होता.

पोलिसांचा संदीप चौधरीवर संशय बळावला. पोलिसांनी त्याचा कसून शोध घेतला. त्याला पकडल्यानंतर संदीपने आपला गुन्हा कबुल केला. आपली मुलगी दररोज दारू पिऊ देत नव्हती म्हणून तिचा राग यायचा असे संदीपने सांगितले. म्हणून गळा दाबून आपण तिचा खून केल्याचे संदीपने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या