Video – भंगाराच्या साहित्यापासून बनवला पंतप्रधान मोदींचा पुतळा

आंध्र प्रदेशच्या पित्रा पुत्रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा उभारला आहे. हा पुतळा साधा सुधा नसून भंगाराच्या साहित्यापासून हा पुतळा बनवण्यात आला आहे.  या पुतळ्यासाठी भंगारातील दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे एक टन भंगाराचे साहित्य वापरण्यात आले आहे. तेलंगाणाच्या हैद्राबाद, तमिळनाडूच्या विशाखापट्टण आणि आंध्र प्रदेशच्या गुंटुर शहरातून हे साहित्य जमा करण्यात आले आहे.

बाईकची साखळी, गीअर व्हील्स, लोखंडी सळई, नट, बोल्ट असे साहित्य या पुतळ्यासाठी वापरण्यात आले आहे. हा पुतळा बनवण्यासाठी 10 कलाकार दिवस रात्र काम करत होते. पंतप्रधान मोदींचा तब्बल 14 फुट उंचीचा पुतळा या कलाकारांनी साकारला आहे.


साधारण कुठलाही पुतळा कांस्यधातूपासून बनवला जातो. परंतु पंतप्रधान मोदींचा पुतळा भंगारातील साहित्यापासून बनवताना त्यांचा चेहरा बनवण्यात अडचण आली असे व्यंकटेश राव म्हणाले. मोदींच्या चेहरा, केशभुषा, दाढी आणि चष्म्यासाठी वायरचा उपयोग करण्यात आल्याचे राव यांनी सांगितले.

हा पुतळा बनवायला तब्बल 25 दिवसांचा कालावधी लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी आपल्या वयाची सत्तरी पूर्ण करत आहेत. त्याचे औचित्य साधून भाजप नगरसेवक मोहन राजु यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींचा हा पुतळा बंगळुरुच्या एका उद्यानात बसवण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या