#MeToo आणखी एका अभिनेत्रीने केला लैंगिक अत्याचाराचा आरोप

42

सामना ऑनलाईन । मुंबई

#MeToo ही मोहीम हिंदुस्थानात सुरू झाली आणि अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली. #MeToo चे वादळ क्षमते असे वाटत असतानाच आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत सांगितले आहे. दंगल चित्रपटामधील अभिनेत्री फातिमा सना शेखने तिच्यासोबत देखील लैंगिक अत्याचार झाल्याचे मान्य केले आहे. फातिमाने प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत सांगितले.

फातिमाला प्रसारमाध्यमांनी #MeToo विषयी विचारले त्यावेळ ती म्हणाली की हिंदुस्थानात महिलांना लैंगिक अत्याचाराची एवढी सवय झाली आहे की ते अगदी सहजपणे हा अत्याचार सहन करत असतात. त्यावर प्रसारमाध्यमांनी तिच्यासोबत असे काही घडले आहे का असे विचारले. त्यावेळी तिने तिच्यासोबत देखील लैंगिक अत्याचार घडला आहे मात्र तिच्या आयुष्यातील ती बाजू तिने फार कुणाला दाखवलेली नाही असे सांगितले.

‘माझ्या आयुष्यातील त्या घटनेविषयी मी फक्त माझ्या जवळच्या व्यक्तींशी बोलले आहे. मी अजुनही त्या घटनेशी लढतेय. पण मी याबाबत बोलत नाही त्यामुळे कृपया माझ्याबाबतीत काही चुकीचा विचार करू नका’, असे तिने यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या