Lok Sabha ElectionResults नंतर आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन होणार आहे. 9 जून रोजी नरेंद्र मोदी ( PM Modi ) हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. सलग तिसऱ्या पंतप्रधान होणारे मोदी हे पहिले पंतप्रधान असणार आहेत. मात्र पहिल्या दोन टर्ममध्ये भाजपकडे एकट्याकडे बहुमताचा आकडा असल्यानं 2014 आणि 2019 NDA चं अस्तित्व केवळ नावा पुरतंच होतं. आता मात्र भाजपकडे 240 जागा असून JDU आणि TDP हे किंगमेकर ठरले आहेत. आता मात्र पंतप्रधान मोदींना सहयोगी पक्षांना सोबत ठेवणं, त्यांची नाराजी होऊ नये याची काळजी घेणं आवश्यक बनलं आहे. सहयोगी पक्षांच्या नाराजीची भितीची तलवार त्यांच्या डोक्यावर कायम असून तिच भिती त्यांनी आजच्या संसदीय पक्षाच्या भाषणात झळकली.
आपल्या भाषणाच्या त्यांनी आज मोदींवर जनतेचा विश्वास आहे या व्यतिरिक्त NDA शब्दावर कायम राहण्याचा प्रयत्न केला. तसेच भाषणाच्या शेवटाकडे वळताना त्यांनी मंत्रिपदाच्या मुद्द्याचा उल्लेख केला. ‘विकासाचा रोड मॅप घेऊ आपण चालणार आहोत. पण आता काही नवे खासदार सोबत आले आहेत, काही जूने खासदार देखील आहेत काही अधिक अनुभवी खासदार देखील आहेत. तर गेल्या दोन – तीन दिवसात टिव्हीवर आपण पाहात असाल बऱ्याच चर्चा आहेत पण त्यात जराही सत्यता मला वाटत नाही. कोणी काय बोलतो, कोणी काय बोलतो. मी म्हटलं जरा विचारा तरी ही माहिती हे लोक (मीडिया रिपोर्टर) आणतात कुठून आणि अशा गप्पा ठोकतात. कोणाच्या खात्यात काही टाकून चर्चा चालल्या आहेत. गेल्या 10 वर्षात अशी काही संधी आली नव्हती त्यामुळे हे थोडे दिवस अशा उकळ्या फुटत राहतील. पण तुम्ही निश्चित धरून चला की काही लोक म्हणतील माझा चांगला संबंध आहे की मंत्रिपदासाठी मी तुमच्याबद्दल बोलू शकतो आणि आपल्यालाही माहित नसतं त्यामुळे मंत्रिपद मिळवण्यासाठी आपल्या चुकून त्यांचा हात पकडू शकतो आणि मग कळत नाही तो आपल्याला कुठल्या खड्ड्यात टाकतो. कधी कधी तर तंत्रज्ञानाचा वापर करून माझं नाव, सही असलेली यादी देखील बाहेर दाखवली जाईल की हे मंत्री बनले. कुणी बुद्धीमान तर खातेवाटपही दाखवेल. तर अनेक जण सरकार बनवण्याचा प्रयत्न करत आहे, खाते वाटप करत आहेत, पद, व्यवस्था वाटप करत आहेत. तेव्हा माझा आग्रह असेल की जे मोदींना ओळखत असतील ते जाणतात की हे सारे प्रयत्न निरर्थक आहेत. तुम्ही कुणाचा फोन आला तर 10 वेळा व्हेरिफिकेशन करून घ्या की, ज्याने फोन केला तो खरोखर अधिकारी व्यक्ती आहे का. नाहीतर कुणीही फोन करेल की तुमचं नाव आहे, परिवाराला बोलवा, शपथविधीला या. तर अशा गप्पा मारणाऱ्यांची मोठी टोळी असते. काही सवयीने करतात, कोणी मजा येते म्हणून करतात, काही वाईट इच्छेतून करतात. माझा आग्रह आहे की आपण या षड्यंत्राचा भाग बनू नये’.
असं म्हणतानाच त्यांनी विरोधकांना फेक न्यूजचे एक्सपर्ट अशी टीका केली. तेही कदाचित याचा खूप उपयोग करतील असा आरोप त्यांनी केला. पण कृपाकरून या अफवांपासून दूर रहा, अशी विनंती केली.
सहयोगी पक्षांच्या प्रमुखांकडे नजर टाकून ही टीम अनुभवी टीम आहे. हे मला योग्य मार्गदर्शन करतील. त्यामुळे ही टीम योग्य निर्णय घेणारी टीम आहे यावर विश्वास ठेवा. Breaking News च्या आधारावर हा देश चालणार हे लक्षात ठेवा, असंही मोदी म्हणाले.