… म्हणजे तुमचा फोन हॅक झाला समजा, जाणून घ्या हे खास फिचर

स्मार्टफोन हॅक झाला तर मोठे नुकसान होऊ शकते. पण, फोन हॅक झाला आहे की नाही हे सहज तपासता येईल. अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये एक खास फीचर आहे, ज्याच्या मदतीने हॅकर्स किंवा इतर कुणी गुपचूप संभाषण ऐकत आहे की नाही हे ओळखता येईल. जेव्हा अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये कॅमेरा किंवा माइक अॅक्टीव्ह करता तेव्हा उजवीकडे एक मिनी आयकॉन दिसेल. तो ग्रीन लाईटच्या, डॉटच्या स्वरुपात देखील येतो. अशा स्थितीत जर तुम्ही कॅमेरा किंवा माइकचा वापर केला नाही आणि त्यानंतरही कॅमेरा आणि माइकचा ग्रीन डॉट स्क्रीनवर दिसत असेल तर तुम्हाला धोका आहे असे समजा.