
मनासारखी पोस्टींग मिळावी यासाठी भोंदू अशोक खरात याच्याशी एका वरिष्ठ महिला अधिकाऱयाने आर्थिक व्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे ही अधिकारी चांगलीच अडचणीत आली आहे.
भोंदू खरात याचे सत्ताधाऱयांबरोबरच वरिष्ठ सनदी अधिकाऱयांशी घनिष्ठ संबंध होते. त्यातूनच नाशिकमध्ये वरिष्ठ पदावर असलेल्या महिला अधिकाऱयाने मनासारख्या पोस्टींगसाठी खरातशी संपर्क साधला. सध्या ही अधिकारी नाशिकमध्ये कार्यरत नाही. मात्र, राज्यात ती ज्या ठिकाणी आहे, तेथून तिला चौकशीसाठी बोलाविले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भोंदू खरात याच्याशी संबंधित अधिकाऱयांचे यामुळे धाबे दणाणले आहे.




























































