चाचणीस नकार दिल्याच्या वादातून महिला नर्सला मारहाण झाल्याची घटना सांताक्रूझ येथील पालिकेच्या दवाखान्यात घडली. नर्सने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी महिले विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
रुग्णाचा रक्तदाब आणि सारखेचे प्रमाण तपासल्यावर त्याना डॉक्टरकडे पाठवण्याची जबाबदारी त्यांची होती. सायंकाळी एक महिला तपासणीसाठी आली होती. ती महिला महिन्याभरापूर्वी रुग्णालयात आली होती. तेव्हा तिची आरबीएस चाचणी झाली होती. महिलेने नव्याने चाचणीस नकार दिला. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. वाद झाल्यानंतर तिने मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तक्रारदार महिलेच्या लक्षात आला. तिने त्याला विरोध केला. विरोध केल्यानंतर तिने तक्रारदार महिलेला मारहाण केली.