
बोस्निया-हर्झेगोविनाने कतारवर एकतर्फी विजय मिळवत बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. गट ‘ब’ मधील सामन्यात बोस्निया-हर्झेगोविनाने कतारला 3-1 ने पराभूत केले. बोस्नियाच्या केरिमने 29 व्या मिनिटाला पहिला गोल केला. 34 व्या मिनिटाला कतारच्या महमूदने आपल्याच गोलजाळ्यात चेंडू धाडला आणि बोस्नियाची गोल आघाडी दुप्पट झाली. त्यानंतर कतारने पुनरागमन करत 42 व्या मिनिटाला गोल केला खरा, पण त्यानंतर त्याला एकही गोल करता आला नाही. बोस्नियाने 80 व्या मिनिटाला गोल करत आपला विजय निश्चित केला.


























































