लहानपणी लैंगिक अत्याचार झाला, ‘अर्जुन रेड्डी’तील कलाकाराचा धक्कादायक खुलासा

862

‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटामध्ये भूमिका साकारलेल्या एका कलाकाराने मंगळवारी सोशल मीडियाद्वारे धक्कादायक खुलासा केला आहे. ‘अर्जुन रेड्डी’ में विजय देवराकोंडा याच्या मित्राची भूमिका साकारलेला अभिनेता राहुल रामकृष्णा याने लहानपणी आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे ट्वीट केल्याने खळबळ उडाली. राहुलने एकामागोमाग एक ट्वीट करून आपले दु:ख जगासमोर व्यक्त केले आहे.

‘लहानपणी माझा लैंगिक छळ झाला होता. ही आठवण खूपच त्रासदायक आहे. मला माहिती नाही मी याबाबत नक्की काय बोलू, फक्त मला स्वत:ला जाणून घ्यायचं आहे’, असे ट्वीट राहुल रामकृष्णा केले.

यानंतर आणखी एका ट्वीटमध्ये तो म्हणतो, ‘मला असे वाटते की आयुष्यामध्ये खूप एकटेपणा असतो. मी या घटनेला माझ्या आयुष्यातील एक ‘ब्लॅक होल’ मानतो. त्यामुळे मी याला जास्त महत्त्व देऊ इच्छित नाही.’ तो पुढे लिहितो, ‘हा, हे खूपच दु:खदायक आहे. तुम्ही यामुळे योद्धा बनता. मी माझ्यावर थोपललेल्या गुन्ह्यासह जगतोय. यामध्ये मला कधीही न्याय मिळणार नाही. परंतु आपल्या लोकांचे भले होण्यासाठी आपण बोलत राहिले पाहिजे.’

ramakrishna

राहुल रामकृष्णा याने चित्रपट इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी पत्रकार म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर तो तेलुगू चित्रपटांमध्ये काम करू लागला. ‘साइनमा’ या लघुपटाद्वारे चर्चेत आलेल्या राहुल रामकृष्णा याला अल्लू अर्जून हा नुकत्याच आलेल्या ‘अला वेंकुंटपुरम लो’ या चित्रपटातही दिसला. यासह त्याने ‘ची ला साओ’, ‘भारत अने नेनू’, ‘जयम्मू निश्चयाम्मू रा’, ‘शीशमहल’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘मिठाई’ यासारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

ramakrishna1

आपली प्रतिक्रिया द्या