फायनान्स कंपनीत वरिष्ठ अधिकारी, एक्झिक्युटीव्ह ते फील्डवर काम करणाऱया कर्मचाऱयांपर्यंत सर्वांवरच टार्गेट पूर्ण करण्याचा प्रचंड दबाव असतो. या दबावाखाली येऊनच फायनान्स कंपनीच्या मॅनेजरने आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. मृतदेहाशेजारी 5 पानांची सुसाईड नोटही मिळाली असून ज्यामधून कंपनीने रिकव्हरी टार्गेट पूर्ण करण्याचा दबाव आणल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यात म्हटले आहे. उत्तर प्रदेशच्या झांसी येथील गुमानावरा भागातील पिछोर गावात राहामारा 42 वर्षीय तरुण सक्सेना हा एका खासगी फायनान्शियल कंपनीत क्षेत्रीय मॅनेजर पदावर काम करत होता.
सुसाइड नोटमध्ये नेमके काय
ज्या लोकांनी कर्ज घेतले आहे त्यांच्याकडून वसुली करू शकत नसशील तर तू स्वतः ते पैसे फेड असा दबाव वरिष्ठ आणत होते असे तरुणाने आपल्या सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. मी माझ्या काय समस्या आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु वरिष्ठांनी मुळीच ऐकून घेतले नाही. मी जवळपास मागचे 40 दिवस नीट झोपूही शकलेलो नाही. प्रचंड तणावाखाली आणि टेन्शनमध्ये आहे. नीट जेवणही करू शकलो नाही इतका त्रास मला वरिष्ठांनी दिला आहे असे तरुणाने सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे.