नोटाबंदीनंतर भ्रष्टाचारात वाढ, अर्थमंत्री सीतारमण यांनी केले मान्य

5986

मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळामध्ये नोटाबंदीसारखा मोठा निर्णय घेतला होता. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे तेव्हा सरकारने म्हटले होते. परंतु देशात नोटाबंदीनंतर भ्रष्टाचार आणि पैशांचा काळाबाजारमध्ये वाढ झाल्याचे वृत्त आहे. लोकसभा सचिवालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर’ने याला दुजोरा दिला आहे. तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही हे मान्य केले आहे.

संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना नोटाबंदीनंतर भ्रष्टाचारात वाढ झाल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी मान्य केले की, नोटाबंदीनंतर देशात चलनातील रोकड वाढली असून याचा थेट संबंध बेकायदेशीर कामांशी आहे. यासंबंधी त्यांनी काही आकडेवारी संसदेमध्ये सादर केली.

नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीचा निर्णय झाल्यापासून चलनातील रोकड वाढली आहे. 4 नोव्हेंबर, 2016 ला देशात 17,174 बिलियम रुपयांचे रोख सर्क्यूलेशन होते. तेच आता 29 मार्च, 2019 ला वाढून 21,137 बिलियन रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या