
आपण अन्न शिजवून खातो. परंतु काही अन्नपदार्थ असे आहेत की, ते कच्चे खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जातात. यात अनेक पोषणमूल्य असल्यामुळे काही अन्नपदार्थ हे कच्चेच खायला हवेत.
कच्चा कांदा अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतो. तो शिजवल्याने कर्करोगापासून संरक्षण करणारे फायटोकेमिकल्स कमी होतात. कच्चे कांदे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्ताच्या गुठळ्या रोखण्यास मदत करू शकतात. ते कर्करोगाच्या पेशी तयार होण्यास देखील मदत करते.
पोटावरील चरबी कमी होण्यासाठी ‘ही’ घरगुती पेयं प्यायलाच हवीत, वाचा
काकडी शिजवल्याने तिची चव खराब होत नाही तर, त्यातील पोषक घटक देखील कमी होतात. कच्ची काकडी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
कच्च्या ब्रोकोलीमध्ये अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि फायबर असतात. जास्त शिजवल्याने त्याचे पोषक घटक नष्ट होऊ शकतात.
लसणात असलेले सल्फर संयुगे आणि अँटीऑक्सिडंट्स आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. स्वयंपाक केल्याने हे घटक नष्ट होतात. म्हणून ते कच्चे किंवा हलकेच कुस्करून खाणे चांगले.
टोमॅटो कच्चे आणि शिजवलेले दोन्हीही फायदेशीर आहेत. कच्चे टोमॅटो व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. त्यांना जास्त शिजवल्याने हा फायदा कमी होऊ शकतो.
गाजर हे फायबर आणि जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत आहेत. ते शिजवल्याने काही पोषक तत्वे कमी होतात. दररोज सॅलडमध्ये कच्चे गाजर खाणे पचनासाठी फायदेशीर आहे.
हिवाळ्यात गर्भवती महिलांनी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा? जाणुन घ्या
पालक यासारख्या हिरव्या पालेभाज्या कच्च्या खाल्ल्यास जास्त व्हिटॅमिन सी आणि ई मिळते. जास्त उष्णता या पोषक तत्वांना नुकसान करू शकते.
बीट कच्चे खाल्ल्याने त्याच्या फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्सचे पूर्ण फायदे मिळतात. शिजवल्याने त्याचे गुणधर्म कमी होतात, म्हणून ते सॅलडच्या माध्यमातून कच्चे खाणे अधिक उत्तम मानले जाते.



























































