आठवड्यातून किमान एकदा पालक सूप का प्यायला हवे, जाणून घ्या

ऋतू कुठलाही असो, सूप पिण्याचे आपल्या शरीराला खूप फायदे मिळतात. सध्या हिवाळा सुरु आहे. मूळातच वातावरणात असलेल्या गारव्यामुळे, आपल्या शरीरात काहीतरी गरम जाणे हे खूप गरजेचे आहे. गरम पदार्थ हा जर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा पोषक असेल तर, मग बात ही कुछ और है.. अशाच मस्त पावसाळी वातावरणात पालक सूपचा आस्वाद घ्यायचा असेल तर थोडा वेळ काढायलाच हवा. आरोग्यासाठी परिपूर्ण असे हे पालक सूप पावसाळी वातावरणात एक अनोखा आनंद देईल हे नक्की…

तांब्याची भांडी घासण्यासाठी हे आहेत साधे सोपे पर्याय, जाणून घ्या

पालक सूपचे आरोग्यवर्धक फायदे

पालकमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. पालक सूप नियमितपणे पिल्याने हंगामी आजार टाळता येतात.

कॅलरीज असलेले, पोटभर जेवण हवे असेल तर पालक सूप हा एक उत्तम पर्याय आहे. पालकामध्ये असलेले उच्च फायबरचे प्रमाण तुम्हाला बराच काळ तृप्त ठेवू शकते.

सौंदर्यासाठी भाताचा उपयोग कसा करायला हवा, वाचा

पालकातील अँटीऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. यामुळे त्वचा तरुण राहण्यास मदत होते. तसेच पालक सूपमधील लोह निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहन देऊ शकते आणि केस गळणे रोखू शकते.

पालक सूपमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि उच्च फायबर सामग्रीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते. मधुमेहींसाठी ते विशेषतः फायदेशीर ठरू शकते.

पालक हा कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के चा समृद्ध स्रोत आहे. यामुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये या डाळीचा समावेश करणे खूप गरजेचे

पालक सूप हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण पालकमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. याशिवाय पालकमध्ये असलेले पोटॅशियमचे प्रमाण निरोगी रक्तदाब राखण्यास मदत करते.

पालक सूपमध्ये असलेले उच्च फायबरचे प्रमाण पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळते. ते आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देऊन आतड्यांचे आरोग्य निरोगी राखते.

पालक फोलेट आणि लोहाचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. हे पोषक तत्व लाल रक्तपेशी तयार करण्यास, अशक्तपणा रोखण्यास आणि उर्जेची पातळी वाढविण्यास मदत करतात.

रोज रताळे का खायला हवे, जाणून घ्या त्याचे आरोग्यवर्धक फायदे

पालक सूप :-

साहित्य : किमान तीन वाट्या पाणी, एक पालकाची जुडी, १ चिमूट जिरे पावडर, चवीनुसार मीठ, क्रीम
कृती : सर्वात आधी पालक साफ करुन घ्यावा. त्यानंतर पाणी उकळण्यास ठेवावे. या पाण्यास स्वच्छ धुतलेला पालक त्यात घालावा. पालकची पाने नरम पडल्यानंतर, गॅस बंद करावा. त्यानंतर उरलेले थोडेसे पाणी वेगळे काढून ठेवावे. पालक मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करुन घ्यावी.

ही पेस्ट नंतर तुम्हाला हवे तसे मसाले घालून एका पॅनमध्ये काढावी. या पालक सूपला लसूण फोडणी दिल्यास सर्वात उत्तम. पालक सूपला लसूण फोडणी दिल्याने, त्याची चव अधिक वाढते.
त्यानंतर सूप वाढताना यावर वरुन क्रीम घालावे.
हे गरमागरम सूप पावसाळ्यात पिण्याची मजा ही काही औरच आहे.

दररोज केळी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या