रत्नागिरीत आरोग्य सेविकेला कामात धमकी दिल्या प्रकरणी 11 जणांविरोधात  गुन्हा दाखल

414

रत्नागिरीत आरोग्य सेविकेला धमकी दिल्याप्रकरणी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गुरुवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास शोभा घावट वय 46 या आरोग्य सेविका आपल्या मोटार सायकलने दापोली तालुक्यातील अडखळ मोहल्ला येथे आरोग्य सेवा   गेल्या होत्या. तेव्हा त्यांना बिलाल कालावे मौलाना, कादिर कालावे, सुल्तान शिरगावकर, अशफाक कोतवालकर, रऊफ काझी, मुज्जमिल गणी जैतापकर, मोहज्जम सोलकर, रियाज जिनेरे, कासम वाकणकर, हर्षद खान  आणि सिध्दीक शिरगावकर या संशयित आरोपींनी त्यांची मोटार सायकल अडवून आरोग्यसेवा बजावण्यास अटकाव करून धमकी दिली. या प्रकरणी आरोग्य सेविका शोभा घावट यांच्या फिर्यादीवरून संशयीतांविरोधात  दापोली पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास हर्णै पोलिस दुरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन कांबळे हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या