
बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या ‘घूसखोर पंडत’ (Ghooskhor Pandat) या आगामी नेटफ्लिक्स चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनंतर, लखनौच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मिती टीमविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. चित्रपटाच्या शीर्षकामुळे सार्वजनिक भावना दुखावल्या गेल्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या चित्रपटाच्या नावातील ‘पंडत’ या शब्दासोबत ‘घूसखोर’ (लाचखोर) हा शब्द वापरल्याने ब्राह्मण समुदायाचा अपमान होत असल्याच्या तक्रारी अनेक संघटनांनी केल्या होत्या. हजरतगंजचे निरीक्षक विक्रम सिंह यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सार्वजनिक भावनांचा आदर करत या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
वाढता वाद पाहून चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे यांनी एक अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. ‘आमचा चित्रपट हा एक काल्पनिक पोलीस ड्रामा आहे. ‘पंडत’ हे नाव केवळ एका काल्पनिक पात्रासाठी बोलीभाषेतील नाव म्हणून वापरले आहे. हा चित्रपट कोणत्याही जात, धर्म किंवा समुदायावर भाष्य करत नाही. एक चित्रपट निर्माता म्हणून मी अत्यंत जबाबदारीने काम करतो’, असे त्यांनी स्पष्ट केले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निर्मात्यांनी चित्रपटाचे सर्व प्रमोशनल साहित्य (टीझर, पोस्टर्स) तूर्तास काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांनी संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतरच त्याबद्दल मत बनवावे, केवळ काही तुकड्यांवरून न्याय करू नये, अशी विनंतीही पांडे यांनी केली आहे. दरम्यान, ‘फिल्म मेकर्स कम्बाइन’ने या चित्रपटाच्या शीर्षकासाठी अनिवार्य मंजुरी घेतली नसल्याचा दावा करत नोटीस बजावली आहे.
‘घूसखोर पंडत’ मध्ये मनोज बाजपेयी ‘अजय दीक्षित’ नावाच्या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत, ज्याला ‘पंडत’ या टोपणनावाने ओळखले जाते. या चित्रपटात नुसरत भरुचा आणि साकिब सलीम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
fir against manoj bajpayee ghooskhor pandat team after yogi adityanaths directive
lucknow police registered an fir against the director and team of ghooskhor pandat movie starring manoj bajpayee. check neeraj pandeys response and movie controversy.
Keywords: ghooskhor pandat controversy, manoj bajpayee movie fir, yogi adityanath news, neeraj pandey, netflix india, lucknow police fir, pandit community protest, bollywood news marathi, saamana news.

























































