Pune News – अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

शाळकरी मुलीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यातील हडपसर परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपींनी टेलिग्राम बॉट मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवरुन अल्पवयीन मुलगी आणि तिच्या तीन मित्रांचे नग्न फोटो तयार केले. त्यानंतर हे मॉर्फ केलेले फोटो तीन आरोपींनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच ही बाब उघडकीस आली. यानंतर पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदाळे करत आहेत.