नगरमध्ये सामूहिक नमाज पठण केल्याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल

1505
प्रातिनिधीक

राज्यात कोरोना पसरू नये म्हणून सरकारने गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच नगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. असे असताना नगर जिल्ह्यात सामूहिक नमाज पार पाडला या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नगरमधला लालटाकी येथील जलाल शहा बुखारी फता मशिदीत शुक्रवारी सामूहिक नमाजाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा या ठिकाणी 100 ते 125 भाविक नमाज अदा करण्यासाठी आले होते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकराणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या