पुणे: शनिवार पेठेतील इमारतीला भीषण आग, चार जणांची सुखरुप सुटका

joshi-sankul-fire-pune
फोटो - चंद्रकांत पालकर

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यातील शनिवार पेठेतील जोशी संकुल या इमारतीला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले आहे.

प्रभात टॉकीजसमोरील गल्लीतील या इमारतीला गुरुवारी सकाळी आग लागली. या आगीत चार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. आणखी काही जण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत असल्याने जवान इमारतीत शिरून तपास शोध घेत आहेत. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.