अग्निशमन दलात 55 मीटर उंचीचे टॉवर वाहन,आगीवर वरूनही पाणी फवारता येणार

258
प्रातिनिधिक फोटो

मुंबईत दाटीवाटीच्या ठिकाणी पोहोचणारे आणि आगीवर वरूनही पाणी फवारता येणारे अद्ययावत वॉटर टॉवर वाहन अग्निशमन दलात दाखल होणार आहे. रिमोटवर चालणारी ही यंत्रणा असेल. यामुळे दुर्घटनेच्या ठिकाणी अग्निशमन दलाला वेगाने पोहोचणे शक्य होणार असून जीवित आणि वित्तहानी कमी करण्यास मोठा हातभार लागणार आहे.

आग लागल्यासारख्या दुर्घटनेत मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षा आणि त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्याचे काम अग्निशमन दलाकडून केले जाते. यासाठी मुंबईत 34 अग्निशमन केंद्रे असून 270 पेक्षा अधिक वाहनांचा ताफा कार्यरत आहे. मात्र सध्या शहरातील उद्योगधंदे संख्या झपाटय़ाने काढत असून उत्तुंग इमारती, मॉल्स मल्टिप्लेक्सची संख्याही वाढत आहे. मुंबईतील 1.24 कोटी लोकसंख्येपैकी 48 टक्के लोक झोपडपट्टीत राहत आहेत. यातच दाटीवाटीने वाढणाऱ्या बांधकामांमुळे अनेक ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने पोहोचणे कठीण होते. परिणामी आगीवर नियंत्रण मिळवून बचावकार्य करताना अडथळा निर्माण होतो. याकर मार्ग काढण्यासाठी पालिकेच्या अग्निशमन दलात 55 मीटर उंचीचे वॉटर टॉवर काहन खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या वाहनाची किंमत 13 कोटी 27 लाख 4 हजार रुपये असून त्याच्या खरेदीचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार होतो.

मुख्य रस्त्यावर राहून आगीवर नियंत्रण मिळवता येणार

दाटीवाटीच्या वस्तीत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला या ठिकाणी पोहोचणे शक्य होत नाही, मात्र या वॉटर टॉवर वाहनाच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावर राहूनही अडचणीच्या ठिकाणच्या आगीवर नियंत्रण मिळवता येणार आहे. विशेष म्हणजे आगीवर वरच्या बाजूने पाणी फवारणे शक्य होणार आहे. या यंत्रणेचे दोन भाग जर्मनीमधून आणले जाणार असून चेन्नईमध्ये वाहन तयार होईल. पुढील पाच ते आठ महिन्यांत हे वाहन अग्निशमन दलात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या