तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जीएसटी भवनची आग आटोक्यात

2761

मुंबई येथील माझगाव येथे असलेल्या जीएसटी भवन या इमारतीच्या आठव्या मजल्यावर भीषण आग लागली होती.  अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते. अखेर तीन तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या इमारतीतून कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं होतं.

ही आग लेव्हल 4 म्हणजेच गंभीर स्वरूपाची आग असल्याचा इशारा देण्यात आला होता. ही आग आठव्या मजल्यावर लागली होती. तसेच या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.

आपली प्रतिक्रिया द्या