शीळमध्ये भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग, 30 ते 35 गोडाऊन खाक

shil-fire

सामना ऑनलाईन । कल्याण

शीळ डायघर भागातील गौसिया कम्पाऊंड येथे एका भंगाराच्या गोडाऊनला लागली भीषण आग लागली आहे. बुधवारी दुपारी लागलेल्या या आगीत आतापर्यंत 30 ते 35 गोडाऊन जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि 3 अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून घटनास्थळी असणाऱ्या दुचाकी आणि चार चाकी काही गाड्या जाळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.