परभणीत कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत आग

परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील एका बैठक हॉलमधील शॉटसर्कीटमुळे लागलेल्या आगीत एसीसह खुर्च्या आणि अन्य साहित्य जळाले. शनिवारी सकाळी ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवीतहानी झाली नाही.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कुलगुरूंच्या कॅबीनच्या बाजूला असलेल्या एका हॉलमधून अचानक धूर निघू लागला. तेथे उपस्थित असलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आग विझवली. या घटनेत हॉलमधील एसीसह खुर्च्या आणि अन्य साहित्य जळाले आहे. कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या