बुलढाण्यात एकाच वेळी दोन ठिकाणी भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही

1181

मलकापूर येथील नादुरा रोडवरील एम एम जिनिंग फक्टरीला आज दुपारी अचानक लागलेल्या लाखो रूपयांच्या कापुस गठानी जळुन खाक झाले. तर याच वेळी मलकापूर येथीलच लक्ष्मी नगर परिसरात असलेल्या चैतन्य अॅग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये असलेल्या वेस्ट प्लास्टीक मटेरियल ला आग लागल्याची घटना घडली.  या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आग विझवली.

आगीत  जिनिंग फॅक्टरी मध्ये असलेल्या कापुस गठाणी वर झाकलेले प्लास्टीकचे पडम हवेने उडुन विजेच्या तारावर पडल्याने या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा  अंदाज व्यक्त केला जातोय. तर लक्ष्मी नगर परिसरात असलेल्या चैतन्य अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला लागुन असलेल्या पाठीमागील काही जळाल्याने आग लागल्याचं सांगितले जातयं. या आगीत कंपनीत असलेल्या वेस्टेज प्लास्टीक मोठ्या प्रमाणात जळालं आहे. मात्र याठिकाणी आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

विशेष म्हणजे चैतन्य अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ज्या ठिकाणी आग लागली होती त्या ठिकाणी एक अॅसीडने भरलेले ट्रक उभा होता तर या ट्रकची चावी या कंपनी मालक किंवा तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांकडे नसल्याने अग्निशमन दलाला जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागली. लॉकडाऊनमुळे हा ट्रक इथे उभा करून चालक नागपुरला गेल्याची माहिती कंपनीच्या कर्मचार्‍यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या