बिग बी अमिताभ बच्चन सेटवर पोहचण्यापूर्वीच सेटला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

बिग बी अमिताभ बच्चन भूमिका सकारत असलेल्या से रा नरसिंहा रेड्डी चित्रपटाच्या सेटला आग लागल्याने सेट जळून खाक झाला आहे. या चित्रपटचाच्या चित्रीकरणासाठी अमिताभ सेटवर पोहचणार होते. त्यापूर्वीच सेटला आग लागली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांच्या फार्महाऊसवर हा सेट उभारण्यात आला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, सुमारे दोन कोटींच्या सेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चिंरजीवी यांचा 151 वा चित्रपट असलेल्या से रा नरसिंहा रेड्डीचे चित्रीकरण त्यांच्या फार्महाऊसमध्ये उभारलेल्या सेटवर सुरू आहे. या सेटला अचानक आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली असली सेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज गांदीपेट पोलिसांनी वर्तवला आहे. कृष्णा मूर्ती यांनी सेटच्या आगीचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत चिरंजीवीच्या चाहत्यांना घटनेची माहिती दिली आहे. सुटीचा दिवस असल्याने सेटवर कोणाही नसल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे त्यांनी सांगितले. अमिताभ बच्चन चित्राकरणासाठी या सेटवर पोहचण्यापूर्वीच सेट आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे.

कोनीडेला प्रोडक्शनच्या या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत चिंरजीवी, नयनतारा, तमन्ना, विजय सेतुपती, जगपती बाबू, किच्चा सुदीप हे कलाकार चित्रपटात झळकणार आहेत. ब्रिटीश काळात रायालसीमा भागातील एका क्रांतीकारकाची संघर्षगाथा चित्रपटातून मांडण्यात आली आहे.