बदलापूर रेल्वे स्थानकावरील एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर संध्याकाळी सहाच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. एका व्यक्तीने दोघांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक माहिती घेतली.
विकास नाना पगारे (25) याला पोलिसांनी अटक केली असून त्याने दोन जणांवर गोळीबार केल्याचे समजते. पगारे याचे दोन साथिदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पोलिसांनी पगारेकडून दोन पिस्तूल आणि कट्टे जप्त केले आहेत.