
जम्मू-काश्मीरमधील लिपा व्हॅलीत पाकिस्तानी सैन्याकडून विनाकारण गोळीबार करण्यात आला. २६ आणि २७ आॅक्टोबरला हा गोळीबार रात्रीच्या दरम्यान करण्यात आला. यावेळी हिंदुस्थानी सैन्याच्या तळावर पाकच्या सैन्याने गोळीबार केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबाराला हिंदुस्थानी सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. अंधाराचा फायदा घेत लीपा व्हॅलीमध्ये ही घटना घडली.
हिंदुस्थानी सैन्याने केलेल्या योग्य कारवाईने आता सध्या या भागात तणावाचे वातावरण आहे.

























































