निगडीत वर्चस्वाच्या वादातून सराईत गुन्हेगाराकडून गोळीबार; एकजण जखमी

परिसरावर वर्चस्व कोणाचे या वादातून एका सराईत गुन्हेगाराने दुसऱ्या सराईत गुन्हेगारावर गोळीबार केला. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री 11.30 वाजणाच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथे घडली. आकाश दोडमने (रा. श्रीराम हौसिंग सोसायटी, अंकुश चौक, ओटास्कीम, निगडी) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

किरण खवले नावाच्या सराईत गुन्हेगाराने हा गोळीबार केला आहे. ओटास्कीम, निगडी येथील बिल्डींग नंबर तीनजवळ बुधवारी रात्री 11.30 वाजणाच्या सुमारास हा प्रकार घडला. दोडमने आणि खवले यांच्यात परिसरातील वर्चस्वावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे.

ते दोघे बुधवारी रात्री बुधवारी रात्री एकमेकांच्या समोर आले. त्यांच्यात त्यावेळी भांडण झाले. त्यानंतर खवले याने आपल्याजवळील पिस्तुलातून दोडमने याच्यावर गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी दोडमाने याच्या पायाला लागल्याने तो कोसळला. त्यानंतर खवले हा घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांची विविध पथके रवाना केली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या