कश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना जवानांनी लावले हुसकावून

641

जम्मू कश्मीरच्या बारामुला जिल्ह्यात काही दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात होते. तेव्हा जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला, तेव्हा दहशतवादी पाकव्याप्त कश्मीरमध्ये पळून गेले.

सीमेवरील नौगाव भागात शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास 4 ते 5 दहशतावादी हिंदुस्थानी सीमेत घुसत होते. या बाबत माहिती मिळताच सुरक्षादलांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबास सुरू होतात सर्व अतिरेकी पाकव्याप्त कश्मीरमध्ये पळून गेले. या घटनेनंतर बीएसएफने सुरक्षा अजून वाढवली आहे. तसेच त्या भागात शोधमोहीमही हाती घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या