लवकर आणि भरपूर लग्न करा, अभिनेत्याचं खळबळजनक वक्तव्य

कमी वयात लग्न करा आणि एकाहून अधिक लग्न करा असं खळबळजनक वक्तव्य एका अभिनेत्याने केलं आहे. एका टीव्ही शो दरम्यान त्याने हे विधान केलं आहे.

या अभिनेत्याचं नाव फिरोज खान मलिक असं असून तो पाकिस्तानी आहे. पाकिस्तानमध्ये व्हिडीओ जॉकी आणि मॉडेल असलेल्या फिरोजचा चाहतावर्ग मोठा आहे. पण, नुकतंच त्याने एका टीव्ही शोमध्ये आपल्या चाहत्यांना एक विचित्र संदेश दिला.

firoz-khan-pak-full

एका टॉक शो दरम्यान त्याने हे वक्तव्य केलं आहे. या शोच्या निवेदकाने त्याला येणाऱ्या चाहत्यांच्या प्रश्नांपैकी लग्नासंबंधीचा प्रश्न विचारला होता. तेव्हा फिरोज म्हणाला की, मला वाटतं की मी यापूर्वीच लग्न करायला हवं होतं. मला वाटतं लग्न तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा असतं आणि तुम्ही त्यातून खूप गोष्टी शिकता. तसंच, एकाहून अधिक लग्न केली तरीही चालेल, असं वक्तव्य या अभिनेत्याने केलं आहे.

फिरोज खानच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झाल्यास त्याचा विवाह 2018मध्ये सैयदा आलिजे फातिमा रजा नावाच्या तरुणीशी झाला होता. 2019मध्ये त्याला एक मुलगा झाला. आता त्याच्या संसारात आलबेल नसल्याच्या अफवा उठल्या होत्या. मात्र, याबाबत त्याने कोणताही खुलासा केलेला नाही.

शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या मलाला युसुफजाईबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने फिरोज चर्चेत आला होता. त्याने त्याच्या सोशल मीडिया साईटवरून तिला कठपुतली असं म्हटलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या