
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून येत्या 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनी राबवण्यात येणाऱया देशव्यापी ‘फिट इंडिया’ मोहिमेत प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱयाने दहा हजार पावले चालावे असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. इतकेच नव्हे तर त्यानंतरही रोज असा चालण्याचा व्यायाम कायम करावा असेही सांगितले आहे. 29 ऑगस्टला ‘फिट इंडिया’ मोहीम राबवताना त्यात विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी सहभागी आहेत याची खात्री करण्यासाठी प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेने त्याचे व्हिडीओ शूटिंग करावे अशाही सूचना यूजीसीने दिल्या आहेत. त्याची लघुफीत बनवून ती यूजीसीला पाठवावी लागणार आहे.



























































