हवाई दल हेलिकॉप्टर दुर्घटनाप्रकरणी पाच अधिकारी दोषी

339

हवाई दलाचे एमआई-17 हे विमान शत्रू राष्ट्राचे मिसाईल असल्याचे समजून पाडण्यात आले. 27 फेब्रुवारीला झालेल्या या दुर्घटनेत वायुसेनेच्या सहा अधिकाऱयांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पाच अधिकाऱयांना दोषी ठरविण्यात आले आहे.

या दुर्घटनेनंतर विमान बडगाव ग्रामीण भागात कोसळले. यादरम्यान विमानातील ब्लॅक बॉक्सही चोरीला गेल्याने या घटनेच्या तपासात अडथळे निर्माण झाले होते. यानंतर या घटनेच्या चौकशीसाठी एअर कमांडर रँकच्या अधिकाऱयाची नियुक्ती केली होती. या प्रकरणात एक ग्रुप कमांडर, दोन विंग कमांडर आणि दोन फ्लाइट लेफ्टनंट असे पाच अधिकाऱयांना दोषी ठरवले आहे.

एका महत्त्वाच्या कामगिरीवर गेलेले वायुसेनेचे एमआई-17 हे विमान श्रीनगरच्या दिशेने परत येत होते. श्रीनगर एअर बेसच्या दिशेने येणारे हे विमान म्हणजे शत्रू राष्ट्राचे मिसाईल समजून एअर डिफेंस मिसाईल सिस्टमद्वारे पाडण्यात आले होते. त्याचवेळी 100 किमी अंतरावर हिंदुस्थानी वायुसेना आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानात युद्ध सुरू होते. यामध्ये विंग कमांडर अभिनंदनदेखील सहभागी होते.

आपली प्रतिक्रिया द्या