
राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच आहे. बुधवारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आज पुन्हा पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जलजीवन मिशनचे अभियान संचालक जी. श्रीकांत यांची नवी मुंबईतून चार दिवसांत बदली करण्यात आली आहे. त्यांची आता संभाजीनगरचे विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर बदल्या
जितेंद्र पापळकर विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांची बदली सहआयुक्त, जीएसटी, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. गंगाथरन डी. यांची नियुक्ती मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, नवी मुंबई या पदावर करण्यात आली आहे. जगदीश मिनियार मुख्य प्रशासक (नवीन टाऊनशिप), सिडको, छत्रपती संभाजीनगर यांची बदली आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे या पदावर करण्यात आली आहे.



























































