उदगीर येथे पुन्हा कोरोनाचे पाच नवीन रुग्ण आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. रविवारी उदगीर येथे नव्याने पाच रुग्ण आढळून आल्याने आता उदगीरची कोरोना रुग्णांची संख्या 27 वर पोहोचली आहे.

लातूर जिल्ह्यात केवळ उदगीर येथे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 33 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन 28 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 3 डॉक्टरांच्या स्वॅबची पुर्नतपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

बीड जिल्ह्यात 11, धाराशिव जिल्ह्यातील 3 तर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 4 असे एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 46 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.