
मध्य प्रदेशातील पन्ना जिह्यात विहीर खोदताना मातीचा ढिगारा कोसळून पाच कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. अजयगड तालुक्यातील बिहारपुवा येथे मागील काही दिवसांपासून सात मजूर बिनू अहिरवार यांच्या शेतात विहीर खोदत होते. मंगळवारी सकाळी विहिरीच्या मातीचा ढिगारा कोसळला आणि त्याखाली पाच मजूर जिवंत गाडले गेले. ही घटना समजताच एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. दोन-तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्वांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.


























































