रत्नागिरीत नर्सिंगच्या पाच विद्यार्थिनी कोरोनामुक्त 

642

रत्नागिरीत  कोरोनाची लागण झालेल्या नर्सिंग महाविद्यालयाच्या 5 विद्यार्थीनींना आज बऱ्या झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या पाचही जणींचे रूग्णालयाच्या प्रवेशद्वारात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बोल्डे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. जिल्हा रुग्णालयाच्यावतीने त्याचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. नर्सिंग महाविद्यालयातील एकूण सात विद्यार्थींनींना कोरोनाची लागण झाली होती.

रत्नागिरीतील राजिवडा आणि साखरतर येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत असलेल्या नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थीनींना त्या भागात सर्व्हेसाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर सुमारे महिनाभरानंतर एका विद्यार्थीनीला कोरोनाची  बाधा झाल्याने जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली होती. त्यानंतर सर्वांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण सात विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातच उपचार सुरु होते. सातपैकी पाचजणींची प्रकृती पुर्णत: बरी झाली असून त्या कोरोना मुक्त झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या