तमिळनाडूत जलिकट्टू सुरू, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू

279

तमिळनाडूमध्ये पोंगलनंतर जलिकट्टू या साहसी खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. या खेळात एका रानटी बैलाला नियंत्रणात आणायचे असते. अशा या धोकादायक खेळात तमिळनाडूमध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

पुदुकोट्टई जिल्ह्यात एक 32 वर्षीय तरुण बैलाला नियंत्रणात आणत होता, तेव्हा बैलाची शिंगं त्याच्या पोटात खुपसले गेली. त्याला जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. अवनियापुरम जिल्ह्यात एक प्रेक्षक जखमी झाला त्याचाही दोन दिवसानंतर मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

ईरोड तंडल भागात या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. 350 बैलांना नियंत्रणात आणण्यासाठी 300 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. एका तरुणाने तब्बल 14 बैलांवर नियंत्रण मिळवले. बक्षीस म्हणून त्याला बाईक, स्मार्ट आणि घड्याळ देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या