मणिपूरमध्ये चार नक्षलवाद्यांसह पाच जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरमध्ये सुरक्षा दलाने विविध संघटनांशी जोडलेल्या चार नक्षलवाद्यांसह पाच जणांना अटक केली आहे. एनआरएफएमच्या एका सक्रिय कार्यकर्त्याला इम्फाळ आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. इम्फाळच्या पूर्वी जिह्यातील खुराई सजोर लॅरो पुखरी मपाल येथे एका घरातून यूएनएलएफच्या एका कार्यकर्त्याला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. त्यांच्याकडून 9 मिमी पिस्तूल आणि मॅगझीन जप्त करण्यात आली. तर बिष्णुपूर जिह्यातून दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एचके-33 रायफल, मॅगझीन आणि 38 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.