रामनवमीनिमित्त गंगास्नानासाठी गेलेल्या 5 महिला नदीत बुडाल्या, एकीचा मृत्यू; दोघी बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रामनवमीमित्त गंगा स्नान करण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच महिला नदीत बुडाल्याची घटना समोर आली आहे. यापैकी दोघींना वाचवण्यास नागरिकांना यश आले आहे. एकीचा मृत्यू झाला असून अन्य दोघी बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकांकडून बेपत्ता महिलांचा शोध सुरू आहे.

बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील देसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गनियारी गंगा घाटावर ही घटना घडली. रामनवमीनिमित्त नयागाव बरियारपूर गावातील महिला आणि तरुणी स्नान करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात पाचही जणी बुडाल्या. घाटावर उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत दोघींना वाचवले.

बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी स्थानिक डायव्हर्स, नावाडी आणि एसडीआरएफची पथके प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोक आणि दुःखाचे वातावरण आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.