26 नाही 25 जानेवारीला मध्यरात्री तिरंगा फडकवणार  – ओवेसी

2037

26 जानेवारीला नाही तर 25 जानेवारीला मध्यरात्री 12 वाजता तिरंगा फडकवणार असून देश वाचवण्यासाठी चारमिनारसमोर नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करणार असल्याची घोषणा एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. याशिवाय 10 जानेवारीला हैदराबादच्या मीर आलम मशिदीपासून ते शास्त्राrपुरम मैदानापर्यंत ‘सीएए’ कायद्याविरोधात मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 26 जानेवारी रोजी सकाळी 8 किंवा 9 वाजता तिरंगा फडकवण्यात येतो, परंतु आपण 25 जानेवारीलाच रात्री तिरंगा फडकवणार असून राष्ट्रगीतही गाणार असल्याचे ओवेसी यांनी सांगितले. तसेच याचवेळी हिंदुस्थानचे संविधान आणि देश वाचवण्यासाठीची शपथही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते आज रविवारी हैदराबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी आणि एनपीआर लागू करण्याला सुरुवातीपासूनच विरोध असून सरकार मुस्लिमांसोबत भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी  केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या