फ्लिपकार्टवरून मागवला iPhone 12, मिळाला निरमा साबण

पंजाबमध्ये एका तरुणाने फ्लिपकार्टवरून आयफोन मागवला होता. परंतु या तरुणाच्या आयफोन ऐवजी निरमा साबण मिळाला आहे. या प्रकरणी तरुणाने कंपनीकडे तक्रार केली आहे.

चंदीगडच्या सिमरनपाल सिंह या तरुणाने iphone 12 हा 12 GB RAM आणि 128 GB इंटर्नल मेमरी असलेला फोन मागवला होता. फोनची किंमत 51 हजार 999 रुपये असून सिमरनपालने ऑनलाईन पैसे दिले होते.

फ्लिपकार्टचा डिलिव्हरी बॉय सिमरनपालचा फोन घेऊन आला. तेव्हा सिमरनपालने डिलिव्हरी बॉयला फोन अनबॉक्स करण्यास सांगितले आणि सिमरनपालने त्याचा व्हिडीओ काढण्यास सुरूवात केली. जेव्हा बॉक्स उघडले तेव्हा सिमनरपालला धक्काच बसला. बॉक्समध्ये आयफोन ऐवजी निरमा साबण ठेवण्यात आला होता.

सिमनरपालने तत्काळ याबाबत कंपनीकडे तक्रार दाखल केली. कंपनीनेही त्याच्या तक्रारीची दखल घेत दोन दिवसांत त्याचे पैसे परत केले. जेव्हा जेव्हा ग्राहक ऑनलाईन वस्तू मागवतात त्याची अनबॉक्सची प्रक्रियेची व्हिडीओ शूटिंग करावी असे आवाहन टेक रिव्ह्यू करणार्यां नी केले आहे. तसेच अशा घटना घडल्यास तत्काळ कंपनीकडे तक्रार दाखल करावी असे त्यांनी म्ह्टले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या