फ्लिपकार्टवरुन मागवला आयफोन, पार्सल उघडल्यावर निघाले भलतेच

ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांनो सावध राहा. ही बातमी तुमच्यासाठी आहे. एका तरुणाला ऑनलाईन आयफोन मागवणे चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाने फ्लिपकार्टच्या सेलमधून आयफोन 16 खरेदी केला मात्र डिलिव्हरी आल्यावर बॉक्स खोलला त्यावेळी तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली.

फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर बिग बिलिअन सेल नुकताच संपला आहे. कंपनीने संकेतस्थळावर अनेक शानदार ऑफर दिल्या होत्या. अशातच एका ग्राहकाने फ्लिपकार्टवर आयफोन 16 खरेदी केला होता मात्र ज्यावेळी डिलिव्हरी मिळाल्यानंतर त्याने उत्सुकतेने बॉक्स उघडून पाहिला आणि हैराण झाला. 

@bharaths028 नावाच्या अकाऊंट होल्डरने एक पोस्ट केली. त्य़ा पोस्टबाबत त्याने लिहीले की, फ्लिपकार्टच्या बिग बिलिअन सेल दरम्यान आयफोन 16 ऑर्डर केला होता, पण डिलिव्हरी बॉयकडून जेव्हा बॉक्स ओपन करुन घेतला आणि त्यात आयफोन ऐवजी सॅमसंगचा स्मार्टफोन होता. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. आता त्याच्या पोस्टला फ्लिपकार्टने रिप्लाय केला. त्यात फ्लिपकार्टने ग्राहकाची माफी मागितली आहे. आणि नंतर युजरकडून ऑर्डर डिटेल्स पाठवायला सांगितल्या. हा प्रॉब्लेम सॉल्व झाला की नाही याबाबत काही डिटेल्स समोर आलेले नाही.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान आयफोनवर बंपर ऑपर सुरु केली होती. या सेलमध्ये आयफोन 16 ला 60 हजार पेक्षा कमी किंमतीत होता. तर गेल्या वर्षी 79, 990 रुपये सुरुवातीची किंमत होती.  या सेलमध्ये आयफोन 15 आणि 14 ही स्वस्तात दिसत होता.