निवृत्तीनंतर 8 महिने वेतन घेणाऱ्यास उप वनसंरक्षक अधिकाऱ्याची नोटीस

672

सामाजिक वनीकरण विभागातून निवृत्त झाल्यानंतर आठ महिने सेवा करत वेतन घेणाऱ्या वनपाल मोहंमद रफिक शेख बलदार यास उप वनसंरक्षक स. पां. वडस्कर यांनी नोटीस बजावली आहे.

मोहंमद रफिक शेख बलदार हे वनपाल होते. धारशिव येथील सामाजिक वनीकरण विभागातून बदली झाल्यामुळे त्यांना 18 ऑक्टोबर 2017 रोजी कार्यमुक्त करण्यात आले होते. बलदार हे कार्यमुक्त झाल्यानंतर ते संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर तालुक्यातील वनपरिक्षेत्र बाजारसांवगी येथे 25 ऑक्टोबर 2017 रोजी रुजू झाले होते. या ठिकाणी बलदार यांची पदस्थापना झाल्यानंतर आस्थापना विभागामध्ये तब्बल दीड वर्षानंतर म्हणजे 20 जून 2019 रोजी सेवापुस्तिका प्राप्त झाली. बलदार यांच्या सेवापुस्तिकेवर 20 एप्रिल 1961 जन्मनोंद असल्यामुळे वयोमानाने 30 एप्रिल 2019 रोजी निवृत्त होणे बंधनकारक होते.

चार महिन्यांनंतर सेवापुस्तिका मिळाली
सामाजिक वनीकरण विभागात काम करणाऱ्या बलदार रत्नपूर तालुक्यातील बाजारसावंगीमध्ये रुजू झाल्यानंतर आस्थापनातील प्रशासनाला सेवापुस्तिका निवृती तारखेच्या चार महिन्यांनंतर म्हणजे 20 जून 2019 रोजी प्राप्त झाली. आस्थापनातील कार्यालयीन अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना बलदार 8 महिन्यांनंतर निवृत्त झाल्याचे निदर्शनास आले.

वेतनाच्या बिलातील तफावतीमुळे निवृत्तीचा प्रकार उघडकीस
आस्थापना विभागाच्या वतीने वेतनाचे बिल काढत असताना जानेवारीमध्ये तफावत येत असल्याचे निदर्शनास आले. तफावत का येते हे आस्थापना विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता 30 एप्रिल 2019 रोजी वनपाल निवृत्त झाला असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मोहंमद रफिक शेख बलदार या वनपालास 8 जानेवारी 2020 रोजी सामाजिक वनीकरण विभागाच्या प्रशासनाने निवृत्त केले. निवृत्त झाल्यानंतरही आठ महिने वेतन घेत असल्याचे उघडकीस आल्यामुळे उप वनसंरक्षक स.पां. वडस्कर यांनी निवृत्त वनपाल मोहंमद रफिक यास नोटीस बजावली.

आपली प्रतिक्रिया द्या